Ajit Pawar Latest Update : अजित पवार सरकारमध्ये जाताच ठरला विधानसभा,लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला? अजित पवार गटाला मिळणार एवढ्या जागा

Ajit Pawar Latest Update : अजित पवार सरकारमध्ये जाताच ठरला विधानसभा,लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला? अजित पवार गटाला मिळणार एवढ्या जागा

Maharashtra Politics : ५५ विधानसभा मतदारसंघ कायम राहणार असून उर्वरित ३५ विधानसभा मतदारसंघ हे बहुतांश काँग्रेसच्या समोरील असतील अशी रणनीती आखल्याची माहिती आहे.

Mumbai News : भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या १३ जागा मिळणार असल्याची माहिती या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अगोदरच आमचा पक्ष विधानसभेच्या ९० जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ५३ आणि पाठिंबा दिलेल्या दोन अपक्ष आमदारांचे विधानसभा मतदारसंघ गृहित धरले आहेत.

हे ५५ विधानसभा मतदारसंघ कायम राहणार असून उर्वरित ३५ विधानसभा मतदारसंघ हे बहुतांश काँग्रेसच्या समोरील असतील अशी रणनीती आखल्याची माहिती आहे.

Ajit Pawar Latest Update : अजित पवार सरकारमध्ये जाताच ठरला विधानसभा,लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला? अजित पवार गटाला मिळणार एवढ्या जागा
Maharashtra Politics: शिवसेना-भाजपमधील आमदारांच्या नाराजीवर चर्चा? शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री खलबतं

विदर्भ आणि शहरी भागात भारतीय जनता पक्षाला झुकते माप असेल तर, ग्रामीण भागात अजित पवार गटाला मतदारसंघ वाटपात प्राधान्य असेल अशी रणनीती आहे.

तेरा लोकसभा मतदारसंघातही विद्यमान पाच खासदारांचे मतदारसंघ गृहित धरून उर्वरित आठ लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस आणि एमआयएम कडे असलेल्या मतदारसंघाचा सहभाग असेल, असे या नेत्याचे मत आहे.

अजित पवार गटाला लोकसभेच्या १३ जागा

त्यामुळे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या ‘एमआयएम’कडील एकमेव लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवारी मिळेल असे संकेत आहेत.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही संबंधित नेत्याने स्पष्ट केले.

Ajit Pawar Latest Update : अजित पवार सरकारमध्ये जाताच ठरला विधानसभा,लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला? अजित पवार गटाला मिळणार एवढ्या जागा
Laxman Mane : 'RSS कडून फोडाफोडीचं राजकारण, त्या 9 आमदारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला'

काँग्रेसचे मतदारसंघ ‘टार्गेट’

अजित पवार गटाला ९० विधानसभा मतदारसंघात संधी मिळणार असून यापैकी ३५ ते ४० मतदासंघांत त्यांची लढत थेट काँग्रेसच्या उमेदवारांसमोर होईल असे डावपेच असल्याचेच वरिष्ठ नेत्याने सूचित केले.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे चित्र असून या महायुतीचा सामना काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उमेदवारांसोबत असेल असे या माहितीवरून स्पष्ट होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com