Laxman Mane : 'RSS कडून फोडाफोडीचं राजकारण, त्या 9 आमदारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला'

देशातील ब्राह्मण समाज असुरक्षित असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे.
Laxman Mane
Laxman Maneesakal
Summary

भाजप हा पक्ष लोकशाहीवादी पक्ष नसून देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

सातारा : देशातील बहुजन समाजाला सर्वाधिक धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) आहे. याच संघाच्या लोकांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला असतानाही अजित पवार, छगन भुजबळांसह इतर काही जण आता मांडीला-मांडी लावून सत्तेत सहभागी झाले आहेत.

Laxman Mane
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

ही भूमिका आमच्या विचारधारेच्या विरोधी असल्याचे मत माजी आमदार लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, या फोडाफोडीच्या राजकारणाचे एजंट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या वेळी प्रा. अशोक जाधव व इतर उपस्थित होते. माने म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाला पाहिजेत तोपर्यंत सत्तेत राहणार आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता पायदळी तुडविण्याचे काम संघाने केले असून, प्रादेशिक पक्षात फूट पाडून लोकशाही धोक्यात आणली जात आहे. देशातील ब्राह्मण समाज असुरक्षित असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे.

Laxman Mane
NCP Crisis : ज्या पक्षात मी राहिलो, त्या पक्षाचा विश्वासघात कधी केला नाही; भास्कर जाधवांचा तटकरेंवर थेट वार

भाजप हा पक्ष लोकशाहीवादी पक्ष नसून देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या मागे बुरखाधारी असलेली आरएसएसची छुपी कार्यपद्धती असल्याचे दिसून येत आहे. संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ असून, त्यांच्यासह अमित शहा, अदानी व अंबानी या चार जणांनी देश विकला आहे.’’

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर लगेच अजित पवारांसह इतर काही जण भाजपसोबत सत्तेत सहभागी होत आहेत. त्यामुळे मोदींनी राष्ट्रवादीवर आरोप केले त्याचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Laxman Mane
Odisha Police : पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेला 'तो' इंजिनिअर विहेतील; पाटण तालुक्यात खळबळ

शरद पवार यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून हे नऊ जण त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असल्याची टीका माने यांनी केली. अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देऊन अडगळीत टाकण्याचा मानस असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार हे लढवय्ये असून, त्यांना शेवटपर्यंत साथ देणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com