Breaking : अजित पवार फडणवीसांच्या भेटीला; 'या' गोष्टीवर चर्चा

टीम-ई-सकाळ
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकरिता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी दाखल झाले आहेत. उद्या होणाऱ्या सुनावणीआधी भेटीगाठींना वेग आला असून अजित पवार वर्षावर पोहोचले आहेत.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकरिता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी दाखल झाले आहेत. उद्या होणाऱ्या सुनावणीआधी भेटीगाठींना वेग आला असून अजित पवार वर्षावर पोहोचले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अजित पवार यांनी आज दिवसभर अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यात आज उशिरा त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असून उद्याच्या होणाऱ्या सुनावणी आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीला विषेश महत्व प्राप्त झाले आहे. या दोघांमध्ये उद्याच्या न्यायालयात होणाऱ्या सुनावणींवरच चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

धनंजय मुंडेनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले...

दरम्यान, आज दिवसभर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळाला त्यात अजित पवार आणि शरद पवार यांचे ट्विटर वॉर चांगलेच गाजले. अजित पवारांचे म्हणणे शरद पवारांनी खोडून काढले. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आपण साहेबांसोबतच असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्‍नच नाही. कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. अजित पवार यांचे वक्‍तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे असून, जनतेमध्ये गोंधळ आणि चुकीचा समज निर्माण करणारे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar meets Cm Devendra Fadnavis at varsha bungalow