esakal | धनंजय मुंडेनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanajay Munde Clarifies About his political role

मी पक्षासोबतच असून मी आदरणीय पवार साहेबांसोबतच आहे. कृपया, कोणीही कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये ही विनंती. अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.

धनंजय मुंडेनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले...

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई : मी पक्षासोबतच असून मी आदरणीय पवार साहेबांसोबतच आहे. कृपया, कोणीही कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये ही विनंती. अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडात सामील असल्याचे बोलले जात होत. तशा भावनाही काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. यानंतर पहिल्यांदाच ट्विट करत धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


भाजपने दिली 'या' चार नेत्यांना विशेष जबाबदारी

धनंजय मुंडेंच्या ज्या बी ४ बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांना आणून फितवण्यात आलं, त्याच धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत ठेवल्याने इतर आमदारांमध्ये भयाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत होते. जळता निखारा राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत असल्याची भावनाही काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती.

आमदार निवासातून 11 मोबाईल जप्त

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सरकार स्थापन करण्यात आल्यानंतर आमचे सर्व आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 30 तारखेला होणारी बहुमत चाचणीही यशस्वी होण्याचा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता भाजप 30 तारखेला बहुमत सिद्ध करणार की सरकार कोसळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

loading image
go to top