

rupali thombre
esakal
Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करुन नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर यांच्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांना पक्षाने नोटीस पाठवली होती. अखेर ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तसेच अमोल मिटकरी यांचीही प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी झालेली आहे. मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचं बोललं जातंय.