NCP : राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई; जयंत पाटलांचं मोठं पाऊल

jayant patil maharashtra politics
jayant patil maharashtra politics Esakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने विधानसभा अधयक्षांकडे या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे.

आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांवर पक्षविरोधात कार्यवाही केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादीकडून तक्रार प्राप्त झाली असून लवकरच याबबात विचार करु, असं म्हटलं आहे.

त्याआधीच आता पक्ष म्हणून जयंत पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. थोड्याच वेळात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे यांनी यासंबधी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्हिडिओ आणि दोन ओळी त्यांनी लिहल्या आहेत.(Latest Marathi News)

अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com