Ajit Pawar Latest News : शपथविधीला अजित पवारांसोबत पण शरद पवारांना वडील मानणाऱ्या 'या' महिला आमदार नॉट रिचेबल

Saroj Ahire : नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. अहिरे ह्या अजित पवार गटासोबत शपथविधीच्या हजर होत्या.
ajit pawar live updates
ajit pawar live updatesesakal
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आज दोन्ही गटाचं शक्तिप्रदर्श होणार आहे. कुणाकडे किती संख्याबळ हे आज दिसून येईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील एक महिला आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. त्या कोणत्या गटात जातात, हे मागील दोन दिवसांपासून स्पष्ट होत नाहीत.

नाशिकच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. अहिरे ह्या अजित पवार गटासोबत शपथविधीच्या हजर होत्या. त्यानंतर मात्र त्या नॉट रिचेबल झाल्या. दोन दिवसांपासून त्यांचं कार्यालयदेखील बंद आहे. त्यांचे समर्थक विक्रम कोठुळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितलं की, सरोज अहिरे यांना अजितदादांचा फोन आला असेल त्यामुळे त्या तिकडे गेल्या असतील. मात्र सध्या तरी त्या नॉट रिचेबल आहेत.

ajit pawar live updates
Ajit Pawar: 'गडी एकटा निघाला...83 वर्षाचा योद्धा...', अजित पवारांच्या वाटेत शरद पवारांचे बॅनर

अहिरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. विशेष म्हणजे सोमवारी त्यांची सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दोन्ही गटाचं शक्तिप्रदर्शन होत आहे. आज कुणाकडे किती संख्याबळ हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ajit pawar live updates
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? कोणत्या गटात कोणता नेता, आज होणार फैसला

एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. तसे व्हिपही बजावण्यात आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com