Ajit Pawar : 'आम्ही काय बोलणार, घरातल्या लोकांना कायम शेवटच्या पंगतीत…'; शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य

Eknath Shinde Ajit Pawar
Eknath Shinde Ajit PawarSakal
Updated on

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर सरकारमधील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा होत आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांमध्ये वाद होते. मात्र आता अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सामील झाल्याने काही शिंदे गटात नाराजीच्या चर्चा आहेत.

या चर्चेदरम्यान शिंदे गटातील नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेलं सूचक वक्तव्य चर्चेत आहे.घरातल्या लोकांना कायम शेवटच्या पंगतीत जागा मिळते असं म्हणत गुलाबराव पाटील म्हणाले आहेत

शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे सांगितले जात आहे. शिंदे गटातील बरेच आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. यादरम्यान अचानक अजित पवारांनी बंड केलं आणि त्यांना उपमुख्यमंत्रपद देखील मिळालं. इतकेच नाही तर राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Eknath Shinde Ajit Pawar
Ajit Pawar Latest News : 'देवगिरी'वर पुन्हा खलबतं! राष्ट्रवादीचे नेमकं किती आमदार फुटले? अजित पवारांनी बोलवली महत्वाची बैठक

गुलाबराव पाटील काय म्हणाले...

यादरम्यान गुलाबराव पाटलांनी खंत व्यक्त केली आहे. राज्यात काल झालेल्या राजकीय भूकंपाची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती. वरिष्ठांनी बोलून निर्णय घेतला आहे. त्यात आम्ही काय बोलणार असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच घरातल्या लोकांना कायम शेवटच्या पंगतीत जागा मिळाते. आपल्या आमदारांचा लवकरच शपथविधी होईल, असं सूचक विधान देखील गुलाबराव पाटील यांनी केलं. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

Eknath Shinde Ajit Pawar
Sharad Pawar : पवारांनी आधीच लावली सोय? बंडाची कुणकुण लागताच राष्ट्रवादीने बदललेली पक्षाची घटना, 'असे' आहेत मोठे बदल

CM शिंदे काय निर्णय घेणार?

ज्या राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेचे आमदार उद्धवठाकरे यांच्यापासून दूर झाले त्यांच्यासमोर अजित पवारांच्या सरकारमधील एंट्रीमुळे शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमिवर सेनेतील आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेचे आमदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Eknath Shinde Ajit Pawar
NCP Sharad Pawar News : तेल लावलेले पैलवान पुन्हा आखाड्यात! आज पवारांची कराडमध्ये जाहीर सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.