Video : 'अजित पवार राष्ट्रवादी सोडणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला.

पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाचा आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांची पुढची भूमिका काय असेल याची चर्चा सुरु होण्यापूर्वीच भाजप नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कधीही पक्षांतर करणार नाहीत. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी मेगाभरतीसाठी राजीनामा दिला का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुनगंटीवार यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, दादांनी कोणाच्या दबावाने राजीनामा दिलेला नसावा. त्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी ते पक्षांतर करणार नाहीत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनाही या राजीनाम्याबाबत माहिती नव्हते. तशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

...म्हणून अजित पवारांनी दिला राजीनामा?

तर दुसरीकडे पवार यांचा फोन 'स्वीच ऑफ' येत आहे. त्यांचे पीएंचेही फोन बंद आहेत. अजित पवार हे पुण्यातील पूरस्थिती पाहण्यासाठी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता. जितेंद्र आव्हाड यांनीही पत्रकारांना असेच सांगितले होते. 

Vidhan Sabha 2019 : अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar never leave NCP says Sudhir Mungantiwar Maharashtra Vidhan Sabha 2019