...म्हणून अजित पवारांनी दिला राजीनामा?

ncp leader ajit pawar told reason behind resignation of mla
ncp leader ajit pawar told reason behind resignation of mla

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (ता.27) अचनाकपणे राजीनामा दिला आहे. या राजीनामा नाट्यानंतर मात्र अजित पवार हे नॉट रिचेबल येत होते. परंतु अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांचा अचानक राजीनामा

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अजित पवार यांनी राजीनामा दिला, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली असल्याचेही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांच्या राजीनाम्यावर हरिभाऊ बागडे म्हणतात...

काय होता शिखर बँक घोटाळा?
आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेश दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com