Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या गटाचा प्रदेशाध्यक्ष ठरला; 'या' नावाची थोड्याच वेळात घोषणा

Ajit Pawal NCP
Ajit Pawal NCPesakal
Updated on

मुंबईः अजित पवार यांनी बंड करुन शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आम्ही पक्षासोबत आहोत आणि पक्षाच्या चिन्हावरच इथून पुढच्या निवडणुका लढवू, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.

दुसरीकडे शरद पवारांनी हे बंड असल्याचं म्हणून पुन्हा एकदा पक्ष बांधणीच्या कामाला लागणार असल्याचं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांवर अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे.

Ajit Pawal NCP
Amol Kolhe : 'बाप नाही विसरायचा...',काल अजित पवारांना पाठिंबा अन् आज खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत

आज सकाळी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती येत आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात येतंय. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

Ajit Pawal NCP
Chhagan Bhujbal : कट्टर विरोधक बनले एकाच सरकारचे घटक; आता जुळवून घेण्याची वेळ!

काल शपथविधीला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. 'बाप नाही विसरायचा' असं म्हणत कोल्हे यांनी पवारांसोबतच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Ajit Pawar
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com