Ajit Pawar on Abhishek Ghosalkar Murder : विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न; अजित पवारांचे गोळीबाराच्या घटनांवर स्पष्टीकरण

Ajit Pawar on abhishek ghosalkar murder Latest News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar on abhishek ghosalkar murder Mauris Bhai firing  Mauris Noronha shot Killed Shivsena UBT leader
Ajit Pawar on abhishek ghosalkar murder Mauris Bhai firing Mauris Noronha shot Killed Shivsena UBT leader

Ajit Pawar on abhishek ghosalkar murder Latest News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर काल ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर विरोधकांनीकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले की, ही घटना अतिशय चुकीची घडली आहे. पण आपण जर पहिलं तर व्हिडीओमध्ये दोघे गप्पा मारत आहेत. दोघांचं संभाषण स्पष्ट आहे. ते ऐकल्यावर दोघांचे मित्रत्वाचे संबंध असून चांगली ओळख असल्याचं दिसत आहे. याचा व्यवस्थित तपास झाला पाहिजे. उठताना पण घोसाळकर बोलत आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे, अशा घटना कुठेच होता कामा नयेत.

पण बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असेल, आत दोघे त्यांच्या धंदा-पाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने करत आहेत. एकजण हाफ पँन्ट आणि टी शर्टमध्ये दिसतोय. त्यानंतर अशी गोष्ट घडली. याचा तपास केला गेला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar on abhishek ghosalkar murder Mauris Bhai firing  Mauris Noronha shot Killed Shivsena UBT leader
भारताच्या विजयानंतर बांग्लादेशी फॅन्सचा मैदानावरच राडा! महिला संघावर दगडफेकीनंतर बदलला निकाल

विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांना निमीत्त मिळालं आहे. आम्ही नाकारत नाही, पण यामागची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. दोघं बोलत असताना सिक्युरिटीला बाहेर थांबायला सांगितल्यानंतर तो बाहेरच थांबणार. झालेली घटना दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल वर्षा बंगल्यावर चर्चा देखील केली आहे, मी सीपी आणि एसपींना याविषयी बोलणार आहे, कुणा गुंडाची मस्ती सुरू असेल तर पोलिसी खाक्या दाखवावा लागेल असं त्यांना सांगितलं आहे असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar on abhishek ghosalkar murder Mauris Bhai firing  Mauris Noronha shot Killed Shivsena UBT leader
Kisan Protest: दिल्लीतील शेतकऱ्यांची बैठक निष्फळ; आता 16 फेब्रुवारीला 'भारत बंद'ची घोषणा

राज्यातील गोळीबाराच्या घटनांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पहिली घटना मुळशी येथे घडली ते गुंड प्रवृत्तीचेच होते. गुंडानीच गुंडाचा काटा काढला. उल्हासनगरच्या घटनेबाबत जरी ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई तात्काळ करण्यात आली. त्यांच्यातील गोळीबार जमीनीच्या व्यवहारातून झालं आहे. ते तर निवांत पोलीस स्टेशनला बसले होते. त्या घटनेत पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. गोळ्यांचा आवाज आल्यानंतर दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना रुग्णालयात नेलं. सध्या ते धोक्याबाहेर आहेत. पण पोलीसांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारास लगेच अटक केली आणि आता पुढील कारवाई केली जात आहे, असे अजित पवार म्हणाले.

तीन्ही वेगवेगळ्या घटना पाहिल्या तर एक जमीनीच्या वादातून घडल्याचे दिसते , दुसरी कशातून आहे ते निष्पन्न होईल. तिसरी गँगवॉरमधून झाली आहे असेही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Ajit Pawar on abhishek ghosalkar murder Mauris Bhai firing  Mauris Noronha shot Killed Shivsena UBT leader
OTT Release : वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर घरबसल्या पाहा चित्रपट आणि वेब सीरिज

रिवॉल्व्हर देण्याबाबत विचार झाला पाहिजे?

तीन्ही गुन्हे लायसन्स रिवॉल्व्हरने झाल्याबद्दल विचारले असाता अजित पवार म्हणाले की, रिवॉल्व्हर देताना कलेक्टर, एसपीकडून तपासून दिलं जातं. कोणी लोकप्रतिनिधींना बाहेर फिरावं लागतं म्हणून रिवॉल्व्हर दिलं जातं. ते दिल्यानंतर त्यांनीच असा गोळीबार केला तर एसपी, कलेक्टर यांना दोष देऊन उपयोग नाही असेही अजित पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com