Ajit Pawar Video : वेळा पाळण्यावरुन अजित पवारांचे चिमटे; मग चंद्रकांत पाटील म्हणाले, ''मम''

Ajit Pawar and Chandrakant Patil
Ajit Pawar and Chandrakant PatilEsakal
Updated on

पुणेः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक शैलीने कायम चर्चेत असतात. कार्यकर्त्यांनाही ते सल्ले देत असतात. एका कार्यक्रमात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन दादांची उपस्थिती होती. यावेळी पवारांनी वेळेबद्दल सल्ले दिले.

पुणे येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार व शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी अजित पवार उपस्थित होते.

Ajit Pawar and Chandrakant Patil
Maratha Reservation : मराठा शिष्टमंडळाच्या CM शिंदेंसोबतच्या अडीच तासांच्या बैठकीत नेमकं काय झाल?

कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण सुरु असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यावरुन उपस्थितांना उद्देशून बोलताना अजित पवारांनी कार्यक्रमाला उशिरा येण्यावरुन चिमटे काढले.

अजित पवार म्हणाले की, आजकाल जीवनमान बदललं आहे. त्यामुळे निट आणि फिट राहिलं पाहिजे. कुणालाही विचारलं तरी दादा व्हायरल इन्फेक्शन झालंय... काहीही झालं की व्हायरल. त्यामुळे सवयी चांगल्या लावा, वेळा पाळा.. कार्यक्रमाला वेळेत जायला शिका.

Ajit Pawar and Chandrakant Patil
Maratha Reservation: "ओबीसी आरक्षणाला हात लावू देणार नाही म्हणता, मग आज शांत का?"; शेंडगेंचा अजितदादांना सवाल

त्यानंतर चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, अजित पवार हे ओरखडा न काढता चिमटा काढतात. पुढच्या काळात काय केलं पाहिजे, याच्या सुचना दिल्यामुळे दादांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं.. दादांच्या भाषणाला माझं मम.. असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचा सल्ला मानून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com