esakal | 'अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश'
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

'अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश'

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: Heavy Rain fall in Marathwada and Jalgaon: मागील दोन दिवसांत मराठवाड्यातील परभणी, बीड, आणि औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होता. यामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. या पावसाने अनेक ठिकाणची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले की, तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्री पाहणीसाठी गेले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. कन्नड घाटातील दरडी कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले असून सध्या रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली.

विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीवर अजित पवार काय म्हणाले?

'आम्ही पहिली १२ नावं मंत्रीमंडळाने दिली आहेत. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे, यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर काही अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील', अशी माहिती पवार यांनी दिली. याच विषयावर पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यपालांकडून तशी नियुक्ती करता येत नाही असं आम्हाला सांगण्यात आले, ते आम्ही सध्या तपासतो आहे. पण अरुण जेटली पराभूत झाले तेव्हा त्यांना मोदी सरकारने राज्यसभेवर घेतलं होतं.

हेही वाचा: जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

यंत्रणांना चौकशी करण्याचे अधिकार आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी करायला हवे. इतरांनी चौकशीला सहकार्य करायला हवं, असं भाष्यही पवार यांनी केलं. एकनाथ खडसे यांच्या जावयाला चौकशी करून सोडले कळाले पण कारवाई बाबत माहिती नाही, असं उत्तर पवार यांनी दिले.

loading image
go to top