esakal | Jalna Bribe: जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

या प्रकरणी एका गावच्या सरपंचाने एसीबीकडे धाव घेतली होती.

जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

जालना: ग्रामपंचायती अंर्तगत वैयक्तिक नळजोडणी व नवीन पाइपलाइन आरओ व जुनी पाइपलाइन दुरुस्तीचे एमबी तयार केले. त्यानंतर एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा ७५ हजार रुपयांची मागणी करून पहिला हप्त्यापोटी १० हजार रुपये घेणाऱ्या जालना जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या शाखा अभियंत्याला (प्रभारी उपअभियंता) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) औरंगाबाद विभागाच्या मार्गदर्शनाखाली जागीच पकडले. दामोदर पांडुरंग घोरपडे (५३) असे त्या आरोपी अभियंत्याचे नाव आहे.

हेही वाचा: जालना जिल्ह्य़ात नद्यांना पूर;पाहा व्हिडिओ

या प्रकरणी एका गावच्या सरपंचाने एसीबीकडे धाव घेतली होती. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींर्तगत वैयक्तिक नळजोडणी व नवीन पाइपलाइन आरओ व जुनी पाइपलाइन दुरुस्तीचे एमबी तयार करून एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी घोरपडे याने १० हजार रुपये घेतले होते. नंतर तो पुन्हा ७५ हजार रुपयांची मागणी करत होता. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने सरपंचांनी एसीबीकडे धाव घेतली.

हेही वाचा: मांगनी नदीला पूर, जालना जिल्ह्यातील पाच गावांचा संपर्क तुटला

एसीबीने शहानिशा करून औरंगाबाद पोलिस अधीक्षक (एसीबी) डॉ. राहुल खाडे आणि अपर पोलिस अधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला असता, घोरपडे याने ७५ रुपयांची मागणी करून पैसे घेताना त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई सापळा अधिकारी निरीक्षक (जालना) एस. एस. शेख यांच्या पथकातील मनोहर खंडागळे, गणेश चेके, ज्ञानेश्वर म्हस्के, जावेद शेख, प्रवीण खंदारे यांच्या चमूने केली.

loading image
go to top