esakal | शरद पवार- प्रशांत किशोर भेट राजकीय नाही : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Kishor, Ajit Pawar And Sharad Pawar

शरद पवार- प्रशांत किशोर भेट राजकीय नाही : अजित पवार

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना ही भेट राजकीय नाही, असे स्पष्ट केले आहे. प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली आहे. परंतु या भेटीचा तपशील समोर आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी ‘महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. इतकेच नव्हे तर आगामी निवडणुकांमध्ये एकत्र काम करून देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे वक्तव्य केले होते. (Ajit Pawar On NCP President Sharad Pawars lunch with political strategist Prashant Kishor)

हेही वाचा: पुणे 'अनलॉक'; नव्या नियमांबाबत जाणून घ्या सर्वकाही

त्याच्या दुसऱ्याच दिवशी पवार आणि किशोर यांची भेट झाली आहे. या भेटीसंदर्भात अजित पवार म्हणाले, ‘प्रशांत किशोर यांनी ते कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, इतर काही वेगळी कामे असतील. पण त्यांनी आता राजकारणाचे क्षेत्र सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे काहीच कारण नाही. शरद पवार यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्यापैकीच ही भेट आहे.’

हेही वाचा: शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत; नारायण राणेंचा दावा

येत्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट आहे का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘प्रशांत किशोर यांनी स्वत: आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले आहे’

loading image
go to top