esakal | शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत; नारायण राणेंचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत; नारायण राणेंचा दावा

शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत; नारायण राणेंचा दावा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

रत्नागिरी : शरद पवार (Sharad Pawar)साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत.ही त्यांनी काँग्रेसला (Congress)दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो. असे ट्वीट करत नारायण राणे (Narayan Rane)यांनी पवारांच्या वक्तव्यावर भाष्य करत दावा केला आहे.(narayan-rane-claim-on-sharad-pawar-speech-political-marathi-news)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवार साहेब बोलेले होते.आपण २२ वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या २२ वर्षांचा आढावा आपण घेतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे वैशिष्ट्य राहिले की तुमच्या साऱ्यांच्या कष्टाने आणि जनतेच्या बांधीलकीने आज आपण २२ वर्षे आणि दिवसेंदिवस जनमानसात आपली शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यात यशस्वी झालो.असे ट्वीट शरद पवारांनी केले होते.

हेही वाचा- वादळा पुर्वीची ही शांतता. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा!

यावर आज नारायण राणे ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो”, त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसला एकप्रकारे सावधगिरीचा इशाराही दिलाय.