
Ajit Pawar News : "सर्वसामान्यांचे सरकार असल्यावर असंच होणार"; संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्यावरून अजित पवारांचा टोला
मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक दरम्यान हल्ला झाल्याची घटना घडली. देशपांडे यांना अज्ञात आरोपींनी स्टंम्पच्या साहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमी झाले. यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्याचा राजकीय क्षेत्रातून निषेध होत आहे. यादरम्यान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना खोचक टीका केली आहे.
राज्यात सर्वसामान्यांचं सरकार आहे हे वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत वापरताना दिसतात. मुख्यमंत्र्यांचे हेच वाक्य वापरून सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार आहे अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. याबद्दलचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे हे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यालर चार अज्ञातांकडून त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.
तसेच अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. मी माझं काम करत राहील. ज्यांना वाटतं मी या हल्ल्याने घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही, असेही संदीप देशपांडे म्हणाले.