Nagpur ED Raid : नागपुरात आर संदेश ग्रुपवर ईडीचे छापे! रामदास पेठ परिसरात कारवाई सुरू | ED raid on R Sandesh Group in Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED raid on R Sandesh Group in Nagpur

Nagpur ED Raid : नागपुरात आर संदेश ग्रुपवर ईडीचे छापे! रामदास पेठ परिसरात कारवाई सुरू

नागपुरात ईडीने छापेमारी केली असून रामदास पेठ परिसरात कारवाई सुरू आहे. आर संदेश ग्रुपवर ईडीकडून छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.

नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव आग्रवाल यांचे घर आणि कार्यलयावर ईडेने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. आर संदेश ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे असल्याची माहिती समोर येत आहे.

रामदास पेठ परिसरातील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी ईडीचे पथक पोहचले आहे. रामदेव आग्रवाल यांचे बांधकाम आणि औषध क्षेत्रात काम आहे. नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीचे अधिकाऱ्यांनी अद्याप याबद्दल माहिती दिलेली नाहीये.

टॅग्स :Nagpur News