

Rohit Pawar addressing a press conference regarding allegations linked to a deleted tweet posted before the Ajit Pawar plane accident incident.
esakal
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी आज तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी समित ठक्कर नावाच्या व्यक्तीने दांदाचा विमान अपघाताच्या दोन दिवस आधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे ट्विट केले होते ते अवघ्या ७ मिनिटांत डिलिट केले, तोच व्यक्ती मला देखील ट्रोल करत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.