
मुंबई - महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे. तसेच अधिवेशनात काय मुद्दे मांडणार हेही त्यांनी सांगितलं. (Ajit Pawar news in Marathi)
ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आलं ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. सर्वोच्च न्यायालयात या सरकारच्या भवितव्याबाबक प्रलंबित असून त्यावर काहीही निकाल लागला नाही. त्यातच अधिवेशन कमी कालावधीचं आहे. आम्ही दहा दिवस अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर विचार करू असं सांगण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
एकंदरीतच अतिवृष्टी झाली आहे. वैणगंगा नदीला पूर आला असून भंडारा, गोंदीयामधील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्याप्रकारे मदत व्हायला हवी होती, ती शेतकऱ्यांना मदत झाली नाही. हे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. अतिवृष्टी ग्रस्तांच्या मागण्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७५ आण बागायतीसाठी दीड लाख रुपये मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
सरकार कुणाचही असल तरी सरकार अडचणीत असेल तेव्हा भरीव मदत करण्याची गरज आहे. मात्र तस सरकारकडून होत नाही. पीक कर्जाचं वाटप ऑगस्टमध्ये निम्मच उद्दीष्ट गाठलं आहे. जे महत्त्वाचे विषय आहे, ज्याच्यावर चर्चा व्हायला हवी, मात्र क्षुल्लक विषयांवरच चर्चा अधिक होते. आता मधेच वंदे मातरम् काढलं. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मात्र महागाईबद्दल काय निर्णय़ घेणार, जीएसटी कमी करण्यासंदर्भात काय भूमिका घेणार, इंधन दरवाढ किंचित कमी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
मंत्रीमंडळात महिलांना प्रतिनिधीत्व नाही. खातेवाटप उशिरा झालं.उद्या प्रश्नोत्तरे ठेवले नाही. तशा प्रकारची तयारी विधीमंडळाची झालेली नाही. प्रश्नांची उत्तर मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. हे सरकार येऊन काही दिवस झाले असतानाच यांचे काही आमदार हे महाराष्ट्रात संघर्ष पेटविण्याची भाषा करतात. शिवसैनिकांचे हात तोडा, पाय तोडा, ही काय पद्धत आहे का? एकनाथ शिंदेंना, देवेंद्र फडणवीसांना, भाजपला पटत का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
संतोष बांगर यांनी सरकारी कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीवरून अजित पवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही स्वत:ला काय समजता. सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, म्हणत अजित पवार म्हणाले की, अशा लोकांना थांबवलं का जात नाही, त्यांना समजावून सांगण्याचं काम कोणी करत नाही का असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. आमदारच अशी भाषा करतील तर चांद्यापासून बांध्यापर्यंत शेवटच्या माणसाची काय अवस्था होईल, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.