

Ajit Pawar on Mundhwa Land Scam: Blames Registration Officials
Sakal
पुणे : ‘‘मुंढवा प्रकरणाची मला कुठलीही माहिती नव्हती. कुठलाही व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. मुळात अशाप्रकारचा व्यवहार नोंदणी अधिकाऱ्यांनी रोखायला हवा होता.’’ अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केली. ‘भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती शासनाला उपाययोजना सुचविणार आहे. चौकशीतून माहिती समोर येईल,’ असे त्यांनी सांगितले.