वाहतुकीचे नियम मोडल्याचा नेत्यांना फटका; राज ठाकरेंसह अनेकांना हजारोंचा दंड

यामध्ये सर्वाधिक दंड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनावर आहे.
After Raj Thackeray  speech in Aurangabad  AAP demanded action against him
After Raj Thackeray speech in Aurangabad AAP demanded action against him Sakal

वाहतुकीचे नियम सर्रास मोडल्याचा फटका राज्यातल्या राजकारण्यांनाही बसला आहे. हे नियम मोडल्याने त्यांना हजारोंचा दंड सुनावण्यात आला आहे. राज ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा नेते चंद्रकांत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सुनील शेळके यांच्यासह अनेकजणांना दंड बसला आहे.

वाहतूक नियम तोडण्यात सर्वाधिक आघाडीवर आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या वाहनावर २७,८०० रुपयांचा दंड आहे. त्यांनी ऑनलाईन ही रक्कम भरल्याची माहिती मिळतेय. तर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या गाडीवरही १४,२०० रुपयांचा दंड असून त्यांनीही तो भरला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ५,२०० , राज ठाकरे यांच्या वाहनावर ७,९०० तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ६०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

या दंडाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवादही साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, माझं स्पष्ट मत असं आहे की रस्ते तुम्ही चांगले केले. त्यामुळे रस्ता रिकामा असला तर गाडी थोडी वेगात जाते. गाड्या चांगल्या केल्या. पूर्वी कितीही वेग वाढवला तरी गाड्याच चांगल्या नसल्याने काही उपयोग नव्हता. पण आता रस्ते चांगले झाले, गाड्या चांगल्या झाल्या, ट्रॅफिकही कमी झालं. अशा वेळी तुम्ही जर दर सेकंदाला पकडलं आणि दंड लावला तर आम्हाला घरदारच विकावं लागेल.

ते पुढे म्हणाले की, वेग कधी वाढला आणि नोंदवला कधी गेला हे कळतंच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या झिजिया कराला आमचा विरोध आहे. कशावरून तुमच्या कॅमेऱ्याने बरोबर कॅच केलं? पण तरी आम्ही कायदा पाळणारे आहोत. आम्ही कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नाहीत. त्यामुळे दंड भरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com