Ajit Pawar : अखेर अजित दादा बोललेच, मी शपथविधी...

गेल्या काही दिवसांपासून पहाटेची शपथविधी पुन्हा चर्चेत
Ajit Pawar reaction Morning Swearing
Ajit Pawar reaction Morning Swearing
Updated on

Ajit Pawar reaction Morning Swearing गेल्या काही दिवसांपासून पहाटेची शपथविधी पुन्हा चर्चेत आली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा करण्यात आली होती. असा खुलासा केल्यानंतर या चर्चेने अधिक जोर धरला आहे. अशातच आज पुण्यातील एका कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. मात्र, त्यांनी माध्यमांकडे येणं टाळलं. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी दोनचं शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात दुपारी झालेल्या कार्यक्रमानंतर अजित पवार थेट गाडीकडे वळले. पवारांनी माध्यमांकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अनेक तर्क वितर्क काढण्यात आले आहेत.

दरम्यान, टी व्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत, पवार यांनी शपविधीसंदर्भात भाष्य केलं आहे.

काय म्हणाले पवार?

ज्यावेळीस ही घटना घडली तेव्हा मी सर्व पत्रकारांना सांगितलं आहे की, मी याविषयावर बोलणार नाही. मग तुम्ही मला पुन्हा पुन्हा हे कशाकरता विचारता? असा संतप्त सवाल माध्यमांना उपस्थित केला. मी ज्यावेळी माझ्या मताशी ठाम असतो. मला बाकिच्यांचबद्दल बोलयचं नाही. मी शपथविधीबद्दल बोलणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com