
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत गंभीर आरोप केले होते. ज्यात त्यांनी असा दावा केला होता की, सत्ताधारी पक्षाच्या विद्यमान आमदाराचा नातेवाईक या घटनेत सहभागी होता. तसेच त्यांनी पोलिसांवर राजकीय दबावाखाली येऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्या घटनेचा संपूर्ण कहाणीच सांगितली आहे.