
Rohit Pawar: स्व. आर.आर. पाटील यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी थेटपणे भाष्य करत माझ्यामुळेच तू आमदार झालास, अशी कबुलीच जणू रोहित पवारांच्या विजयाच्या बाबतीत दिली आहे. त्यांचा पुनरुच्चार चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा पहिल्यांदा काका-पुतणे समोरासमोर आलेले होते, तेव्हाही अजित पवारांनी म्हटलं होतं की, थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं.