Ajit Pawar : कोण आहेत श्रीनिवास पवार? अजित पवार का घेतात त्यांचा सल्ला, जाणून घ्या

अजितदादांनी राजकारणाची एबीसीडी काका शरद पवार यांच्याकडून शिकली.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Who Is Shrinivas Pawar In Marathi : आजवर अजितदादांच्या कुटुंबाचा संपूर्ण पवार घराण्याशी जवळचा संबंध आहे. हे कुटुंब महाराष्ट्रातील एक शक्तिशाली आणि समृद्ध कुटुंब म्हणून ओळखले जात आहे. संपूर्ण कुटुंब वेळोवेळी एकत्र येते.

अजितदादांनी राजकारणाची एबीसीडी काका शरद पवार यांच्याकडून शिकली असेल, तरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते एका दुसऱ्याच व्यक्तीकडून सर्व प्रकारचे सल्ले घेतात. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाबद्दल आणि या व्यक्तीबद्दल जाणून घेऊया.

अजित पवार २०१९ च्या निवडणूकीनंतर पहाटेच्या शपथ विधीनंतर काही तासांसाठी गायब झाले असं म्हटलं जात होतं तेव्हा ते श्रीनिवास पवार यांच्या घरी होते असे समजले होते. शिवाय आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावरही ते श्रीनिवास पवार यांना भेटायला गेले होते.

अजित पवार वेळोवेळी यांचा सल्ला घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे एवढी महत्वाची ही व्यक्ती कोण आहे?

Ajit Pawar
Ajit Pawar: शरद पवारांना मोठा झटका! फसवून सही घेतली म्हणणारे आमदार पुन्हा अजित पवारांच्या गोटात दाखल

कोण आहेत श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे उद्योग आहेत. पण प्रत्येक महत्वाचा निर्णय अजित पवार त्यांच्या सल्ल्याने घेतात असं सांगितलं जातं. दोघं भावांमधलं नातं चांगलं आहे.

श्रीनिवास पवार सामान्यतः राजकारणापासून बाहेर राहतात. पण कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते दिसतात. त्यांचा शरयू ग्रुप अनेक कंपन्या चालवते. यात कृषी, ऑटोमोबाईल, रियल इस्टेट, डिलरशीप आणि सिक्युरीटी सर्व्हिसेसमध्ये आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री पवारांना नाही स्वतंत्र बंगला! रविभवनातच व्यवस्था; दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे अडचण

त्यांनी आपला व्यवसाय ऑटोमोबाइल डीलर म्हणून सुरू केला. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा विकास होत राहिला. नंतर त्यांची कंपनी शरयु ऑटोमोबाईल्सने भारतातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोबाईल डीलर्सपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

शरद पवार त्यांचे काका आहेत. जेव्हा शरद पवारांचे राजकारणात वरचे स्थान मिळू लागले तेव्हा अजित पवार त्यांच्याकडे रहायला गेले. काकांच्या सांगण्यावरून त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. अजित पवार हे शरद पवारांचा उजवा हात म्हणून ओळखला जात होते. पण नुकतेच त्यांनी पक्ष फोडून राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.