Vidhan Sabha 2019 :..तर अजित पवारांनी माफी मागावी; संजय राऊत यांची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्यात अटक करण्यात आली होती. मात्र, या अटकेवरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. जर तुम्हाला ही चूक वाटते तर मग आता त्याबद्दल माफी मागा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बाळासाहेबांच्या अटकेविषयी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, बाळासाहेबांना झालेली अटक ही अयोग्य होती. आमच्या मंत्रिमंडळातील काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही अटक झाली होती. आम्ही त्यास विरोध केला होता. इतक्या टोकाचे राजकारण कोणी करू नये, असे आम्ही सांगितले होते. मात्र, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. त्यामुळे आम्ही तो निर्णय मागे घ्यायला लावू शकलो नाही.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनी ट्विटवरून निशाणा साधला. ते म्हणाले, बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. बाळासाहेबांना अटक ही चूक होती. वगैरे वगैरे. हे कळायला इतकी वर्ष लागली. अजितदादा तुमचे अश्रू खरे असतील. तर त्या अटकेबद्दल माफी मागा. जय महाराष्ट्र.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Should Apologized for Balasaheb Thackeray Arrest says Sanjay Raut Maharashtra Vidhan Sabha 2019