Sharad Pawar Threat : 'ती' शरद पवारांना धमकी नाहीये म्हणणाऱ्या बावनकुळेंना अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले…

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar Vs Chandrashekhar BawankuleEsakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यामातून तुमचा दाभोळकर करू अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या नंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही धमकी नसल्याचे म्हटले आहे. यावरू राष्ट्रावादीचे नेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सौरभ पिंपळकर या ट्विटर अकांउटवरून शरद पवारांनी तुमचा दाभोळकर करू अशी धमकी देण्यात आली. या ट्विटर अकाउंटच्या बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला. मात्र आज बावनकुळे यांनी बोलताना ती धमकी नसल्याचे वक्तव्य केलं यावरून पुन्हा राजकीय वातावरण पेटलं आहे.

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Beed News : औरंगजेबाची स्तुती करणं भोवलं! बीडमध्ये १४ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

अजित पवार काय म्हणाले...

याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, भारत आणि महाराष्ट्राला माहितेय आम्ही तुमचा दाभोळकर करू म्हणजे काय करू? याला काही अर्थ नाही. बावनकुळेसारख्या व्यक्तिकडून अशी अपेक्षा नाही.

सरळ मान्य केलं पाहिजे की आमच्या माणसाचं चुकलंय. वेगवेगळी मतमतांतर असू शकतात. पण हे या पद्धतीने बोलायला लागले तर इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील असेच बोलायला लागतील आणि या सगळ्यात विकासाचे प्रश्न बाजूला पडतील. नको त्या गोष्टींना वळण मिळेल, असेही अजित पवार म्हणाले.

बावनकुळेंना फोन झाला तर मी त्यांना बोलणार आहे की तुम्ही काय बोलता? तुम्ही स्वतः एकदा विचार करा की तुमचा दाभोळकर करू म्हटल्यानंतर ती धमकी नाही, असं म्हणणं तुमच्या सदविवेक बुद्धीला पटतं का? असे अजित पवार म्हणालेत.

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar Death Threat : जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, चिंता...

बावनकुळे काय म्हणाले होते?

सौरभ पिंपळकर याने शरद पवारांना धमकी दिलेली नाहीये. कुठल्याही रेकॉर्डमध्ये बघा. धमकी वेगळ्या फेसबुकवरून आहे. धमकी देणं चुकीचं आहे, त्याचं समर्थन करत नाही. मागच्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्द यापेक्षा जे वाईट लिहीलं गेलं, धमकीवजा मोठ्या प्रमाणात अश्लिल लिहीलं गेलं. मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या वॉररुममधून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ज्या गोष्टी बोलल्या गेल्या त्या सरकारने काढल्या पाहिजेत असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar Death Threat : "मी भाजप कार्यकर्ता, सेक्युलॅरीजमचा हेट करतो!"; पवारांना धमकी देणारा पिंपळकर कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com