मुंबई - राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची आहे, राज्य कर्जबाजारी होत आहे, अशा प्रकारची टीका विरोधक करत आहेत, मात्र यात काहीही तथ्य नाही. विरोधकांकडून अपप्रचार सुरू असून, सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच पुरवणी मागण्या सादर केल्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. यानंतर या मागण्या मान्य झाल्या.