याबद्दल मी सर्वांची माफी मागतो : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मी सगळ्यांना विश्वासात न घेता राजीनामा दिल्याने सर्वांची माफी मागतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई : मी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. माझ्या सहकाऱ्यांना याचा वेदना झाल्या. यापूर्वीही असा प्रसंग माझ्यावर आला होता. मी सगळ्यांना विश्वासात न घेता हे केल्याने सर्वांची माफी मागतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सांगितले.

चिंता करण्याचे कारण नाही; कौटुंबिक चर्चा झाली : शरद पवार

तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बेपत्ता असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) तब्बल 19 तासांनंतर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले याठिकाणी त्यांची कौटुंबिक चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेणार हे स्पष्ट झाले होते. तर, शरद पवार यांनी हसत-हसत अजित पवार सर्व माहिती देतील असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, काय असेल कारण...

अजित पवार म्हणाले, की शुक्रवारी मी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. माझ्या सहकाऱ्यांना याचा वेदना झाल्या. यापूर्वीही असा प्रसंग माझ्यावर आला होता. मी सगळ्यांना विश्वासात न घेता हे केल्याने सर्वांची माफी मागतो. सर्वांना अडचणीत आणण्याची भूमिका योग्य आहे, का ही भूमिका माझ्या मनात येत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar speaks at press conference after legislator resignation