चिंता करण्याचे कारण नाही; कौटुंबिक चर्चा झाली : शरद पवार

चिंता करण्याचे कारण नाही; कौटुंबिक चर्चा झाली : शरद पवार

मुंबई : अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, चिंता करण्याचे कारण नाही. अजित पवार सर्व गोष्टी स्पष्ट सांगतील. आमची कौटुंबिक चर्चा होत असते आणि आजही झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बेपत्ता असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) तब्बल 19 तासांनंतर दिसले. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते पोहचले आणि त्यांची कुटुंबियांसोबत बैठक झाली. अजित पवार हे नेमके कुठे गेले आहेत, याची कोणालाही माहिती नव्हती. अखेर आज दुपारी एकच्या सुमारास धनंजय मुंडेंसह अजित पवार सिल्व्हर ओक येथे पोहचले. यापूर्वी त्यांचे भाऊ श्रीनिवास पवारही येथे पोहचले होते. शरद पवार पुण्याहून मुंबईत पोहचल्यानंतर या सर्व घडामोडींना वेग आला. या कौटुंबिक चर्चेनंतर आगोदर अजित पवार आणि नंतर शरद पवार बाहेर आले. यांच्यातील बैठक सुमारे एक तास चालली. अजित पवार सर्व सांगतील पत्रकार परिषदेत, त्यांच्या मुखातून सर्व ऐकणं सर्वांसाठी, पक्षासाठी पण महत्वाचं आहे

शरद पवार म्हणाले, की माझा चेहऱ्यावर हसू असून, मी चिंतीत नाही. आमच्यात वाद वगैरे काही नाहीत. ही राजकीय बैठक नव्हती. कौटुंबिक बैठक होती. आमच्या कुटुंबात पद्धत आहे. आज यावर चर्चा केली. काही कौटुंबिक प्रश्नावरही चर्चा केली. काही मुलांची लग्ने करायची आहेत. धनंजय मुंडे यांच्या घरी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com