esakal | शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय होणार चर्चा? अजित पवार म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय होणार चर्चा? अजित पवार म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Sharad pawar and cm uddhav thackeray meeting) यांना भेटणार आहेत. पवारांनी बुधवारी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शविली होती. इतर पक्षांकडून कामे होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. त्याबाबतच उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज बैठक

बुधवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. यावेळी पराभूत उमेदवारांनी त्यांची भूमिका मांडली. आम्हाला विकास कामासाठी निधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे सत्तेचे वेगळे समीकरण तयार झालं आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अद्यापही तितका समन्वय नाही. तो निर्माण करणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेटीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ''पवार साहेब अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आजच्या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा नाही. तशी काही चर्चा असती, तर आम्हाला नक्कीच बोलावले असते.''

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आघाडीत जिल्ह्यानुसार परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक जिल्ह्याला निवडणूक एकट्याने लढायची की आघाडीबरोबर लढायची? याचा अधिकार द्यावा. जिल्हा पताळीवर निर्णय घेतला तर मतविभाजन टाळता येईल. त्याचा फायदा महाविकास आघाडी सरकारला होईल. स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असेही अजित पवार म्हणाले.

आज कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केंद्रीय संस्थांकडून राज्याच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याबाबतही मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच आरक्षणासह इतर विषयांवरही चर्चा होऊ शकते. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसुद्धा सध्या चर्चेत आहे. शरद पवार यांची काल राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांकडे या आमदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमदारांची ही नाराजी शरद पवार मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

loading image
go to top