esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज बैठक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर होणाऱ्या या बैठकीत काय चर्चा होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातील प्रश्न, महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर होत असलेले आरोप, नेत्यांची नाराजी तसंच महानगर पालिकांच्या निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केंद्रीय संस्थांकडून राज्याच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याबाबतही मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच आरक्षणासह इतर विषयांवरही चर्चा होऊ शकते. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसुद्धा सध्या चर्चेत आहे. शरद पवार यांची काल राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांकडे या आमदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमदारांची ही नाराजी शरद पवार मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

हेही वाचा: वारकऱ्यांना दर महिना पाच हजार मानधन

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना गर्दी होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करू नये आणि कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपयांबाबतही या बैठकीत विचार विनियम होऊ शकतो.

loading image
go to top