
माळेगाव : पंचवीस वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास पुढील ५ वर्षात माळेगाव कारखान्याचा होणार आहे. येथील सभासदांना उच्चांकी ऊस दर देऊन या दराची स्पर्धा राज्यातील साखर कारखान्यांशी करणार आहे. त्यासाठी आमच्या कर्तबगारीचा झेंडा माळेगाववर उभारायचा आहे. त्यामुळे निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांना सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.