esakal | कुटुंबातील 'या' व्यक्तीमुळे वळले अजित पवारांचे मन अन् दिला राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

काका शरद पवार यांच्यासोबत लहानपणापासून राहिलेल्या अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर कुटुंब फुटले असे बोलले जात होते. पवार कुटुंब एक आहे आणि त्या कुटुंबाचे शरद पवार हेच प्रमुख आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी अखेर अजित पवारांचे मन वळविले आहे.

कुटुंबातील 'या' व्यक्तीमुळे वळले अजित पवारांचे मन अन् दिला राजीनामा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (मंगळवार) राजीनामा दिला असून, त्यांचे मन वळविण्यात अखेर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिलाच यश आले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काका शरद पवार यांच्यासोबत लहानपणापासून राहिलेल्या अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर कुटुंब फुटले असे बोलले जात होते. पवार कुटुंब एक आहे आणि त्या कुटुंबाचे शरद पवार हेच प्रमुख आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी अखेर अजित पवारांचे मन वळविले आहे. त्यांनी अखेर आपल्या संस्काराची आठवण करून देत अजित पवारांना पुन्हा कुटुंबात आणले आहे.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.  अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. आज सकाळी सदानंद सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.

काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात; खर्गेंची घोषणा

loading image
go to top