'लॉकडाऊन लावायला आम्हालाही काही आवडत नाही' - उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit pawar
ajit pawar

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली आज दुपारी तीन वाजता मंत्रीमंडळाची बैठक घेतली. लॉकडाउन लागू केला नाही तरी कठोर निर्बंध लादण्यात येतील असं सांगितलं जातं होतं त्यानुसार आज राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. यांसदर्भात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी म्हटलंय की, आम्हालाही कळतंय की, लॉकडाऊनला फक्त पुणेकरांचा नाही तर अख्ख्या राज्याचा विरोध आहे. आम्हालाही काही लॉकडाऊन लावायला आवडतंय असं नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 

राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकांची भीती आता दुर झालीय, मागच्यावेळेस पेक्षा यावेळी संख्या जास्त आहे मात्र, मागच्या वेळसचा एखादा रुग्ण पाच जणांना बाधित करत असेल तर यावेळी तो पंधरा वीस जणांना बाधित करतोय. मात्र, कोरोना बाधिताला आधीइतका त्रास जाणवत नाहीये. आम्ही खासगी हॉस्पिटल्स आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड्स कमी पडू नये, याची काळजी घेतोय. तसेच ऑक्सिजनची राज्यात कमतरता नाहीये, आणि ती भासणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पुढे ते म्हणाले की, लॉकडाऊनला महाराष्ट्राचा विरोध आहे, हे आम्हालाही कळतंय. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या तज्ज्ञांकडून 15 एप्रिलपर्यंत काय परिस्थिती निर्माण होतेय हे पाहिलं जाईल. लॉकडाऊन लावायला आम्हालाही आवडत नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये काही अंशी मतभेद दिसून आले आहेत. पण अखेरचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतली असं सरकारमधील मंत्री म्हणताना दिसत होते. विरोधी पक्षातील नेतेमंडळी मात्र लॉकडाउनला तीव्र विरोध दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती होती. 

असे आहेत नवीन निर्बंध :

  • शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत विकेंड लॉकडाऊन  
  • सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु
  • इंडस्ट्री सुरु राहिल
  • ज्या कंस्ट्रक्शन साईटवर कामगारांना रहायला जागा आहे ते सुरु राहिल
  • सरकारी कस्ट्रक्शन देखील सुरु राहिल
  • बाजारपेठा सुरु राहतील, मात्र गर्दी न होण्याची काळजी घेतली जाईल.
  • राज्यभरात नाईट कर्फ्यू सुरुच राहिल.
  • बससेवा, ट्रेनसेवा सुरु राहिल, मात्र अर्ध्या क्षमतेने पब्लिक ट्रान्सपोर्ट
  • सिनेमागृह, नाट्यगृह बंद राहतील
  • हॉटेल-रेस्त्रां बंद राहतील
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com