Ajit Pawar Press Conference Today
Ajit Pawar Press Conference Todayesakal

Ajit Pawar : छ.संभाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे वाद पेटला, अजित पवार आज भूमिका स्पष्ट करणार

Ajit Pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते करत आहेत. काल (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली भूमिका मांडली होती. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर किंवा स्वराज्य रक्षक म्हणण्यात काही वावगं नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे अजित पवार आज काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ajit Pawar Press Conference)

Ajit Pawar Press Conference Today
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत अपघात

आज दुपारी दोन वाजता अजित पवार पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत. "छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते", असं अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणाले होते, त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. काल पुण्यात देखील याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचा बालेकील्ला बारामतीत देखील अजित पवार यांचा पुतळा जाळण्यात आला.

Ajit Pawar Press Conference Today
Sanjay Raut: २०२४ मध्ये तुम्ही पण जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा; शिंदे गटाला राऊतांचा इशारा

शरद पवार काय म्हणाले

काल बारामतीत पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली. "छत्रपती संभाजी महाराजांप्रती आस्था आहे अशा काही लोकांना ते धर्मवीर आहेत असे वाटले आणि काहींना ते स्वराज्यरक्षक आहेत असे वाटले यावरुन वाद करण्याचे काही कारण नाही, या भूमीचे रक्षण करण्यासाठी संभाजी महाराजांनी प्राणांचे बलिदान केलेले आहे, त्यामुळे धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षक या भूमिकांवरुन वाद करु नये", असे शरद पवार म्हणाले.

Ajit Pawar Press Conference Today
Electricity workers strike : मेस्मा म्हणजे काय रे भाऊ…महावितरण कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’चा वार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com