Ajit Pawar: "अजितदादांना भाजपच्या तिकीटावर लढावं लागणार"; काँग्रेसचा हल्लाबोल

अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीवारी करुन आले यावेळी त्यांनी शहांकडे शिंदे गटाची तक्रार केल्याची चर्चा आहे.
sharad pawar amit shah meet
sharad pawar amit shah meetEsakal
Updated on

मुंबई : अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीवारी करुन आले यावेळी त्यांनी शहांकडे शिंदे गटाची तक्रार केल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अजितदादांना आता भाजपच्या तिकीटावर लढावं लागणार, असा दावा त्यांनी केला. (Ajit Pawar will have to fight on BJP ticket Congress MLA Vijay Wadettivar attack)

sharad pawar amit shah meet
Eknath Shinde: "महाराष्ट्राचे अल्लाबक्ष भाजपच्या प्रचाराला, त्यांची आखरी मंजील..."; CM शिंदेंवर ठाकरे गटाची बोचरी टीका

मविआत असताना तिजोरी साफ केली

वडेट्टीवार म्हणाले, "नेहमीच 'हम करे सो कायदा' अशी ज्यांची भूमिका आहे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये आता ज्यांना असं वाटतंय की निधी मिळत नाही. पण तिजोरीची चावी आता तुमच्याकडेच आहे, त्यामुळं तुम्ही दुसऱ्यांची तक्रार काय करत आहात. तुमची आता धमक दाखवा, महाविकास आघाडीमध्ये असताना तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होतात, आता ही धमक अजितदादांनी दाखवावी" (Marathi Tajya Batmya)

sharad pawar amit shah meet
Future Retail: बिग बाजार ब्रँड असलेल्या कंपनीवर 30,000 कोटींचे कर्ज; कोणी विकत पण घेईना

रडण्याची आणि सडण्याची वेळ

निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? हे दाखवण्याची गरज आहे. दिल्लीचे चरणदास झालेले आता आपली दादागिरी दाखवूच शकणार नाहीत. रडण्याची स्थिती आता अजित पवारांवर आली असेल भाजपसोबत आलेल्यांना रडवून रडवून सडवतात. त्यामुळं आता रडण्याची आणि सडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. (Latest Marathi News)

sharad pawar amit shah meet
Delhi Pollution : दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाचा स्फोट! मागचे सर्व रेकॉर्ड मोडत एक्यूआय 999 वर

भाजपच्या तिकीटावर लढावं लागणार

पुढच्यावेळेस अजित पवारांना भाजपच्याच तिकीटावर लढावं लागेल, असं मला एकूण दिसतंय. त्यांना कमळावर लढल्याशिवाय पर्याय नाही हे मी ठामपणे सांगतो, असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com