

बहरिनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा सुरू आहे. हा चार दिवसांचा खास कार्यक्रम ४ डिसेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंत चालणार असून परदेशातील या लग्नाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून प्रचंड चर्चा मिळत आहे. ४ डिसेंबर रोजी मेहंदीचा रंगारंग सोहळा पार पडला. ५ डिसेंबर रोजी हळद, संगीत आणि मुख्य विवाहविधी पूर्ण झाले. यानंतर ७ डिसेंबर रोजी स्वागत समारंभ आणि ग्रँड रिसेप्शन होणार आहे.