ajit pawar
sakal
मुंबई - राज्यातील आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी प्रत्येकी पाच कोटी निधीपैकी तीन कोटी असे एक हजार ३५४ कोटींचा निधी वित्त विभागाने आज मंजूर केला आहे. विशेष म्हणजे आमदारांचा हा निधी एक कोटीवरुन पाच कोटीपर्यंत करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनीच हा निधी वितरणाच्या फाइलवर शेवटची स्वाक्षरी केली आहे. आमदारांना भरघोस विकास निधी देण्याचा आग्रह धरणाऱ्या अजित पवारांनी सर्वपक्षीय आमदारांना समान निधीचे वाटप करत राज्यातील सर्व आमदारांना शेवटची भेट देऊन गेले.