जीव घेईन एकेकाचा; अतिक्रमणविरोधी पथकावर फळविक्रेत्या महिलेची दगडफेक (व्हिडिओ)

Akola
Akola

अकोला : अकोला शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले, टपरी व्यावसायिकांवर आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम राबवून कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान एका फळविक्रेत्या महिलेनं मनपाच्या अतिक्रमण पथकाच्या अधिकाऱ्यांवर धक्काबुक्की करत दगडफेक केली.

ही घटना अकोल्यातील जठारपेठ परिसरात घडली आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधील अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज उमरी ते जठारपेठ रोडवर अतिक्रमण हटविण्याची विशेष मोहीम राबविली. 

या मोहिमेदरम्यान अतिक्रमण केलेल्या टपर्‍या, हातगाड्या हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण टपर्‍या, हातगाड्या हटवत नसल्याचे पाहून पथकाच्या जेसीबीने अनेक टपर्‍यांवर प्रहार करून त्या तोडल्याचे कळते. मात्र, यावेळी एका फळ विक्रेत्या महिलेनं मनपाच्या कारवाई विरोध करीत पथकावर दगडफेक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com