Akshay Kumar: अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक? मनसे नेत्या विरुध्द गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक? मनसे नेत्या विरुध्द गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रोळी विभागप्रमुख गणेश चुक्कल याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेता अक्षय कुमारची बहीण अलका हिरानंदानी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गणेश चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश यांच्यावर आरोप आहे की, घर हडपण्यासाठी खोटे कागदपत्र तयार करून,खोट्या सह्या केल्या.

अलका हिरानंदानी यांच्या कंपनीमार्फत गणेश चुक्कल यांनी 3 वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला होता. मात्र, गणेश चुक्कल यांनी अलका हिरानंदानी यांची खोटी सही करून बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित फ्लॅट 30 वर्षांच्या करारावर भाड्याने घेतल्याचे दाखवले. विषेश म्हणजे गणेश यांनी हिरानंदानी यांचे लाखो रूपयांचे भाडे बुडवीले आहे, त्यानंतर हिरानंदानी यांनी पोलिसात धाव घेवून. तक्रार केली आहे. पुढील तपास पवई पोलिस करत आहेत.

तर मनसे नेते गणेश चुक्कल यांनी अलका हिरानंदानी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण कोणतीही खोटी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. ते कोर्टात सिद्ध होतील, असे गणेश चुक्कल यांनी म्हटले आहे.

Web Title: Akshay Kumar Sister Cheating Case Filed Against Mns Leader

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeraymnsmns party