काजू, मोहाच्या दारूला विदेशीचा दर्जा; वाचा मंत्रिमंडळ निर्णय

मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची इलाईट आणि सुपर प्रिमियम अशा दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे.
alcohol
alcoholsakal
Updated on

मुंबई : काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारूला आता यापुढे विदेशी (Foreign Liquor) दारूचा दर्जा दिला जाणार आहे. याबाबत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या (Maharshatra Cabinet Decision) बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयापूर्वी या प्रकारच्या दारूला देशी दारूचा (Deshi Alcohol) दर्जा देण्यात आला होता. मात्र, आजच्या निर्णयानंतर आता काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनवलेल्या बनलेल्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्यात आला आहे. त्याशिवाय मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची इलाईट आणि सुपर प्रिमियम अशा दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे जी छोटी दुकान आहेत ते दुकानदार आता दुकानाचा विस्तार करून मद्य विक्रीची कक्षा वाढवू शकणार आहेत. (Cashew Moha Flower Alcohol )

alcohol
वा छान, काय नाव ठेवलंय मुलाचं!, काजल अग्रवालच्या मुलाचं नामकरण

इलाईट गट 600 चौरस फुटांपर्यंत विस्तार करु शकणार आहेत. तर, सुपर प्रिमियम गटातील दुकानदार 600 चौरस फुटांच्यावरदेखील विस्तार करु शकणार आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत महसूल वाढीसाठी एफएल-2 परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

alcohol
महाराष्ट्रातील राजकीय स्कँडल : महाजनांना अडचणीत आणणारं प्रकरण माहितीये?

काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारूची अपेक्षित विक्री होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता यापासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानांत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना त्यांच्या दुकानाचा विस्तार करुन मद्यविक्रीची कक्षा वाढवता येणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल असा राज्य सरकारचा मानस मानस आहे. याशिवाय फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन आणि त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठीही धोरण आखण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com