
अलिबाग : अलिबाग एसटी बस आगाराची अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी बसेस वेळेवर न लागणे, फलाटाजवळी कठडे तुटणे अशा असुविधांचा फटका प्रवाशांना बसत आहे. मात्र, एसटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहे.