
अलिबाग : अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हा रस्ता अरुंद असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकही हैराण झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात नुकतीच यासंदर्भातील बैठक पार पडली.