EXIT Poll : महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार; असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युती सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत.​

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युती सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. 24 तारखेला निवडणुकीचा निकाल समोर येणार असून त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एबीपी-सी व्होटर्सच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 192 ते 216 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, आघाडीला 55 ते 81 जागा मिळतील इतर पक्षांना 4 ते 21 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

न्यूज 18च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना महायुतीला दणदणीत यश मिळणार आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल असेच सांगण्यात आले आहे. काँग्रेसला 17 तर राष्ट्रवादीला अवघ्या 22 जागांवर समाधान मानावे लागेल. आघाडीच्या मिळून केवळ 41 जागा निवडून येतील असे सांगण्यात आले आहे. भाजपला सर्वाधिक 144 आणि शिवसेनेला 99 जागा मिळतील असा अंदाज आहे. महायुतीला मिळून 243 जागा मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे.

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 109 ते 124 तर शिवसेनेला 57 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसला 32 ते 40 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसला 40 ते 50 ते जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वेगवेगळ्या एक्झिट पोलची आकडेवारीः 

टाईम्स नाऊ :
बीजेपी+ : 230
काँग्रेस+ : 48
अन्य : 10

इंडिया टुडे :
भाजप+ : 166-194
काँग्रेस+ : 72-90
अन्य : 22-34

सीएनएन न्यूज 18  
भाजप+ : 243
काँग्रेस+ : 41
अन्य : 4

रिपब्लिक 
भाजप + : 223
काँग्रेस + : 54
अन्य : 11

एबीपी न्यूज 
भाजप + : 204
काँग्रेस + : 69
अन्य : 15


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all Exit poll result BJP and shivsena clear majority in Maharashtra