Grampanchayat Result: 'या' गावाने केली कमाल; सर्वच्या सर्व... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grampanchayat Result Satara

Grampanchayat Result: 'या' गावाने केली कमाल; सर्वच्या सर्व...

साताराः राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये काल पार पडलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचे आज निकाल लागले. सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एका गावाने धक्कादायक निकाल दिलाय. सर्व मोठ्या पक्षांच्या उमेदवारांनी धूळ चारत अपक्षांना संधी देण्यात आलीय. गावकऱ्यांच्या ह्या अनोख्या एकजुटीची राज्यभर चर्चा होतेय.

जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलचे सर्व उमेदवार पडले. मतदारांनी सर्वच्या सर्व अपक्ष उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे राज्यामध्ये भणंग ग्रामपंचायतचा निकाल लक्षवेधी ठरला.

विदर्भामध्ये भाजप आघाडीवर आहे. चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघात तब्बल १५ ठिकाणी भाजप लीड करत असल्याची माहिती आहे. तर काँग्रस ७ ते ८ ठिकाणी पुढे असून तीन ठिकाणी इतरांना सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळेल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना धक्का बसला आहे. भंडाऱ्यातील साकोली मतदारसंघात एकमेव निवडणूक लागली होती. सिरेगाव येथील या निवडणुकी भाजपचे रोहित संग्रामे सरपंच म्हणून विजयी झालेले आहेत.