
छत्रपती संभाजीनगर - ‘मराठवाड्यातील ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी नाहीत, अशांसाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करणे आवश्यक होते. त्यासाठी संबंधित शासन निर्णय (जीआर) खूप गरजेचा होता. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही मराठ्यांच्या हिताची साधी ओळही नव्हती, ती आता या ‘जीआर’मुळे मिळणार आहे. यात मराठवाड्यातील नोंदी नसलेला प्रत्येक मराठा आता कुणबी होईल आणि आरक्षणाच्या कक्षेत येईल,’ असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले.