लोकशाही वाचवायची असल्यास ईव्हीएम हटवा; विरोधक एकवटले!

वृत्तसंस्था
Friday, 2 August 2019

मुंबईत आज (ता. 2) सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, राजू शेट्टी, कपिल पाटील व आदी महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

'ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. ईव्हीएम हटले तरच लोकशाही वाचेल. सर्व विरोधी पक्ष आपले वाद विसरून ईव्हीएम हटविण्यासाठी एकत्र आले आहेत. शिवसेना भाजपनेही आमच्यासोबत येऊन ईव्हीएमविरोधात उभे रहावे,' असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 

मुंबईत आज (ता. 2) सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, राजू शेट्टी, कपिल पाटील व आदी महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे. ईव्हीएम विरोधात 21 ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

जपान, नेदरलँड आणि अमेरिकेत या तीन देशांमध्येच ईव्हीएमची चीप तयार होते. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निवडीवरच प्रश्न निर्माण झाला आहे अशात आम्ही त्याच देशात आमच्या देशातल्या ईव्हीएमची चीप आणली जाते तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. 371 मतदारसंघांमध्ये घोळ आहे, 54 लाख मतांचा गोंधळ आहे असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.

ज्या देशांनी ईव्हीएमची निर्मिती केली किंवा पद्धत अंगिकारली त्या देशांनीही आता ईव्हीएमची पद्धत बाजूला ठेवली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे तर लोक तुम्हाला पुन्हा निवडणून देतील. तुम्हाला बॅलेट पेपरला घाबरण्याची गरज काय? असं छगन भुजबळ यांनी विचारलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All opposition parties come together against EVM machine